Home मनोरंजन ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला रामदास आठवलेंच्या रिपब्लिक पार्टीत प्रवेश

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला रामदास आठवलेंच्या रिपब्लिक पार्टीत प्रवेश

0

काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अभिनेत्री पायल घोष ही बरीच चर्चेत आली होती. या अभिनेत्रीने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी या पक्षात प्रवेश केला आहे. आज २६ ऑक्टोबर २०२० ला मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षप्रमुख रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पायल घोषने पक्षप्रवेश केला असून आठवलेंनी पायल घोषला पक्षाची महिला उपाध्यक्ष म्हणून स्थान दिले.

ANI वृत्तसंस्थेच्या मीडिया न्यूजमध्ये पाटील घोष फोटोत रिपाईचा झेंडा हाती घेऊन आहे. अभिनेत्री पायल घोषने जेव्हा अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता तेव्हा रामदास आठवलेंनी तिला चांगला पाठिंबा दिला होता. यासंदर्भात पायल राज्यपाल कोश्यारी यांना भेटायला गेली होती तेव्हाही आठवले तिच्या सोबत तिथे उपस्थित होते. त्यामुळे पायल घोष रिपाईमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती व आज तिने या चर्चेला सत्य ठरवत रिपाई पक्षात प्रवेश केला आहे.