Home मनोरंजन केरळमधील हत्तीण प्रकरणात अक्षय कुमार संतापला

केरळमधील हत्तीण प्रकरणात अक्षय कुमार संतापला

0

कालपासून सोशल मीडिया वर केरळ मध्ये एका गर्भवती हत्तीनीच्या मृत्यबद्दल एकचं हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही याबाबत सोशल मीडियावर आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेहि सोशल मीडियावर यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फेसबुकवर पोस्ट करत अक्षय कुमारने लिहिले- “कदाचित प्राणी हे माणसांपेक्षा कमी जंगली असतात आणि मानवाकडे माणुसकी कमी असते.त्या हत्तीबाबत जे झाले ते अतिशय हृदयविदारक, अमानुष आणि न स्वीकारले जाणारे आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जावी. #AllLivesMatter ‘

काय आहे केरळ मधील हत्ती प्रकरण?

फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा केरळमध्ये मृत्यू झालाय. माणूस आणि प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.

ही हत्तीण 14-15 वर्षांची असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं.

पलक्कडमधल्या सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कचे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “तिला जिथे जखम झाली होती ती जागा आम्हाला मिळालीच नाही. ती फक्त पाणीच पीत होती.