Home मनोरंजन …आणि नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले;कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी.

…आणि नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले;कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी.

0

प्राईम नेटवर्क : ‘दहशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले होते.

नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला होता. तसेच,सोशल मीडियाच्या प्रयत्नांमुळे #बॉयकॉटसिद्धू;द कपिल शर्मा शो अंतर्गत सिद्धू यांना त्यातून काढून टाकल्याशिवाय शो सुरू करू देणार नाही असे सांगण्यात आले होते. अशा दबावामध्ये निर्मात्यांना निर्णय घ्यावा लागला आणि सिद्धूला शोमधून काढण्यात आले.

अखेर कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धू यांच्या जागी अर्चना पूरण सिंह या शोची नवीन परिक्षक असरणार आहे. खुद्द अर्चनानेच या बाबतचे ट्वीट करत माहिती दिली आहे.