Home मनोरंजन …कारण मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या सिनेमात काम देत नाहीत : अक्षय कुमारने...

…कारण मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या सिनेमात काम देत नाहीत : अक्षय कुमारने केला खुलासा

0

मोठ्या आणि बहिचर्चित दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा ही प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराला असतेच. अर्थात त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची गर्दी वाढते आणि आर्थिक फायदा देखील होतो. मात्र सर्वानाच बड्या दिगदर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळत नाही याबाबत एक मोठा खुलासा सुपरस्टार अक्षय कुमारनं केला आहे, आतापर्यंत त्याने बऱ्याचदा नव्या दमाच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. ‘असं का, मोठ्या दिगदर्शकांसोबत का नाही?’ असा प्रश्न विचारला असता अक्षयने खूपच छान उत्तर दिलं.

अक्षय कुमार म्हणाला, की ‘ मलाही मोठ्या दिगदर्शकांसोबत काम करण्याची इच्छा असते मात्र तरी देखील मी नव्या दिग्दर्शकांसोबत काम करतो, कारण मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या सिनेमात काम देत नाहीत, संधी देखील देत नाहीत. आयुष्यात अशी वेळ आल्यानंतर आपल्याला आपले रस्ते निवडायचे असतात किंवा बदलायचे असतात. जर मोठी नाही तर छोटी काम का होईना मात्र करत राहायचं कारण थांबून चालणार नाही’ अक्षयच्या या उत्तेरने सर्वच आवक झाले तर फॅन्स मात्र अक्षयच्या बोलबाला करीत आहेत.