Home मनोरंजन सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉयकॉट खानचा ट्रेंड जोरात!

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉयकॉट खानचा ट्रेंड जोरात!

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. १४ जूनला सुशांतनं मुंबईतल्या त्याच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहर यांना जबाबदार धरलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर प्रचंड टीका होत आहे एवढंच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता सलमान खानला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कालच त्याने मौन सोडत यावर प्रतिक्रिया दिली होती. ट्विटरवर त्याने त्याच्या चाहत्यांना एक आवाहन केले होते. ‘माझ्या चाहत्यांनी माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा. सुशांतच्या चाहत्यांच्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायी असते,’असे सलमानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्याच्या या ट्विटनंतर त्याला आणखी ट्रोल केले जात आहे. अ‍ॅक्टिंग चांगली करतोय, आता हे ढोंग सोड, असे काहींनी त्याला सुनावले आहे.