Home खेळ स्पर्धा हरभजनसिंग आता करतोय चित्रपटात काम, पोस्टर रिलीज

हरभजनसिंग आता करतोय चित्रपटात काम, पोस्टर रिलीज

0

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन याच्यासोबत स्वत: हरभजन दिसत आहे. हरभजनने चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्याचे त्यावरून दिसते,त्याच्या पहिल्या डेब्यू चित्रपटाचे हे पोस्टर आहे.

हरभजन सिंगने नुकताच सोशल मीडियावर तो भूमिका करत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तमिळ भाषेमध्ये ‘फ्रेंडशिप’ नावाच्या चित्रपटात तो आपले नशीब आजमावत आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याचे बोलले आहे.
तसेच हिंदी आणि पंजाबी भाषेत देखील या चित्रपटाचे डबिंग करून ‘रिलीज’ करण्यात येणार आहे.

जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या हे दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन देखील भूमिका करत आहे. या चित्रपटात हरभजन सिंगची काय भूमिका आहे हे अद्याप कळू शकले नाही. पण पोस्टरवर त्याचे चित्र असल्याने कदाचित त्याला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.