Home अर्थजगत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ७००० पानी दोषपत्र न्यायालयात दाखल

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ७००० पानी दोषपत्र न्यायालयात दाखल

0

एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवा व सारंग वाधवा यांच्या व्यतिरिक्त आणखी १२ अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यांनी १६ लाख खाते असणाऱ्या पीएमसी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा केल्याने खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे. विशेषतः सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोक आर्थिक अडचणीपायी दुःख आणि आक्रोश सोबतच व्यक्त करीत आहेत. दरम्यान काही निर्दोष सर्वसामान्य खातेदारांचा मृत्यू देखील झाला आहे. २३ सप्टेंबर रोजी रिजर्व बँकेने पीएमसी बँकेवर प्रशासक नेमला असून सध्या या बँकेचा सर्व व्यवहार प्रशासन पाहत आहे. आरोपी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोघांनाही प्रथम मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. मात्र पुढे ऑक्टोबर महिन्यात ईडीने त्यांचा ताबा घेतला.

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवा व सारंग वाधवा यांच्या विरोधात सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात ७००० पानी दोषपत्र दाखल केले असून तयांच्यावर पीएमएलए अ‍ॅक्टच्या वेगवेगळ्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.