Home माहितीपूर्ण ‘हा’ फोटो पाहून महिंद्रा यांनी एका गरीब सायकल चालकाला आधुनिक वाहन देण्याचा...

‘हा’ फोटो पाहून महिंद्रा यांनी एका गरीब सायकल चालकाला आधुनिक वाहन देण्याचा निर्णय घेतला…

0

नीरज प्रताप सिंग नामक एका ट्विटर युजरने महिंद्रा कंपनीला टॅग करून एक फोटो पोस्ट केला होता. या फोटो मध्ये एक सायकल रिक्षाच्या मागे महिंद्रा कंपनीचा उलटा लोगो लावण्यात आला होता.

हा फोटो पाहून दिग्गज व्यावसायिक, महिंद्रा कंपनीचे चेयरमन आनंद महिंद्रा यांनी खुश होऊन एक कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यांनी त्या सायकल रिक्षा चालकाला नवं आणि आधुनिक वाहन देण्याचं ठरवलं आहे आणि तसं त्यांनी स्वतः त्या ट्विट मध्ये आपलं उत्तरही दिलं. त्यांचं ट्विट खालील प्रमाणे..

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात. ते कायम आपल्या कस्टमर आणि फॅन्सना उत्तर देतात, व्हिडीओ, पोस्ट शेयर करतात. नीरजने पोस्ट केलेला फोटो पाहून त्यांनी खुश होऊन सायकल रिक्षा चालकाला नवीन अत्याधुनिक वाहन देण्याचा निर्णय घेतला. परिणामी आता आनंद महेंद्रा यांचं सोशल मिडीवर भरभरून कौतुक होत आहे.