Home महाराष्ट्र अभिजित बिचुकले यांना व्हायचंय मुख्यमंत्री : राज्यपालांची घेणार भेट

अभिजित बिचुकले यांना व्हायचंय मुख्यमंत्री : राज्यपालांची घेणार भेट

0

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकांमुळे आणखीनच चर्चेत आले आणि आता तर अभिजित बिचुकले यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. बिचुकले म्हणतात, ‘येत्या दोन दिवसांत ते राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावाही करणार आहेत. त्याच बरोबर बिचकुले यांनी सर्व पक्षीय आमदारांना पत्र लिहून त्यांना पाठिंबा देण्याचं देखील आवाहन केलं आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार सत्ता स्थापनेसाठी महायुतीचं काहीच ठरत नसल्याने बिचुकले यांनी या सत्ता संघर्षात उतरण्याचे ठरवले आहे. एवढंच नाही तर त्यांनी सर्व पक्षीय आमदारांना उद्देशून एक पत्र लिहिलं असून आपल्याला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन त्याद्वारे ते करीत आहेत. सोबत “मी लवकरच सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार” हे देखील जाहीर केलं. अभिजित बिचुकले याचे ते पत्र खलील प्रमाने सविस्तर..

बिचुकले यांचं हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र बिचुकले खरंच असं काही करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.