Home महाराष्ट्र आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा हिस्सा नाही, सुप्रिया सुळेंच व्हाट्सअप स्टेटस

आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा हिस्सा नाही, सुप्रिया सुळेंच व्हाट्सअप स्टेटस

0

प्राईम नेटवर्क : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी अजित पवार यांच्यावरचा राग सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेस्टस द्वारे दाखवल्याचं दिसून आलं.

ज्या प्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादी मध्ये फूट पडली त्याच प्रमाणे आता आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा भाग नाही, असं शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं व्हाट्स अप स्टेटस ठेवल्याने अजित पवार यांना कुटुंबापासून दूर व्हावं लागल्याने अजित पवार यांच्या साठी खूप मोठा धक्का मानला जातो, याच वेळी अजित पवार भाजपच्या गोटात गेल्याने शरद पवार आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसल्याच समोर येत आहे,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभार व्यक्त करत म्हटले आहे कि, त्यांनी पुन्हा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्या बद्दल आभारी आहे, राज्यातील जनादेशाला शिवसेनेने नाकारले आहे, त्यांनी दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लवकरच विधिमंडळात बहुमत सिद्ध करू असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलं.