Home महाराष्ट्र युवतीला पाहून रिक्षात गैरवर्तन! विडिओ रेकॉर्ड करून पोलिसात तक्रार

युवतीला पाहून रिक्षात गैरवर्तन! विडिओ रेकॉर्ड करून पोलिसात तक्रार

0

महिला सुरक्षा मुद्दे चव्हाट्यावर लागणे काही जणू नित्याचीच बाब बनत चालली आहे. नुकत्याच समोर आलेल्या घटनेमध्ये एका रिक्षाचालकाने मागील सीट वरील युवतीला पाहत अश्लील कृत्य केल्याची अत्यंत घृणास्पद व धक्कादायक बाब समोर येतेय. ४९ वर्षीय आरोपी हा या युवतीला मालाडच्या एका विद्यालयात घेऊन जात होता. ANI च्या बातमीनुसार ही घटना गोरगावात घडली.

या तरुणीने त्या चालकाचा विडिओ रेकॉर्ड करून पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तिची सोशल मीडिया वरची पोस्ट सुद्धा तितकीच वायरल होत आहे. या आधीसुद्धा रेल्वेच्या डब्यात महिला प्रवाशांकडे पाहून अश्लील कृत्य करणारी घटना घडली होती. असल्या घाणेरड्या वृत्तींना वेळीच आळा बसणे आवश्यक आहे. राज्यात असणाऱ्या स्त्री सुरक्षा कायद्यांसमोर सुद्धा असल्या घृणास्पद गोष्टींना सामोरे जावे लागणे ही फार गंभीर बाब आहे.

मुंबई पोलिसांनी वरील घटनेची दखल घेत पुढील ट्विट केले-