Home महाराष्ट्र महाविकासआघाडीचे बहुमत सिद्ध तर विधानसभेतून भाजपचा सभात्याग…

महाविकासआघाडीचे बहुमत सिद्ध तर विधानसभेतून भाजपचा सभात्याग…

0

सकाळच्या वृत्तानुसार महाविकासआघाडीला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. त्यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकासआघाडीच्या नेत्यांनी १६९ मतांचा विश्वासदर्शक ठराव प्रस्थापित केला. त्यावेळी एमआयएम, सिपीआयएम तसेच मनसेच्या काही आमदारांनी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. तसेच महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठराव मांडताच भाजपच्या उपस्थित नेत्यांनी सभात्याग केला असे मीडिया न्यूजवरून समजले.

विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र हे अधिवेशन असंवैधानिक असल्याचे सांगत भाजपने या ठरावावर बहिष्कार टाकला. मुख्यतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन घटनाबाह्य असल्याचा आरोप करीत सभात्याग केला. तसेच मंत्र्यांनी घेतलेली शपथ देखील अवैध आहे असे देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले. तसेच यासंदर्भातील आरोपांचे पत्र राज्यपालांना देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.