Home महाराष्ट्र शरद पवारांचा नातू रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी खेळली हि...

शरद पवारांचा नातू रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी खेळली हि खेळी

0

प्राईम नेटवर्क : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आधीच पेचात सापडली आहे, लोकसभा निवडणुकीत मावळ मधून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा जबर धक्का बसला होता, अशातच शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी कडून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, रोहित पवार कर्जत-जामखेड मधून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालं असताना, भाजप सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मावळची पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे.

नगर जिल्ह्यात महाजनादेश यात्रा आली असताना वरिष्ठ नेत्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, मात्र राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे या सर्वांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघात मात्र पालकमंत्री राम शिंदे यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी याच सभेत राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर करत चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. जितकं जास्त मताधिक्य तितकं मोठं खातं दिलं जाईल अशी घोषणा देखील यावेळी केली. यावेळी राम शिंदे यांचं मंत्रिपद कायम ठेवणार असल्याचा पुनुरुच्चार मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. यामुळे रोहित पवारांना येथून उमेदवारी मिळाल्यास राम शिंदे त्यांना योग्य टक्कर देऊ शकतील, अशी यामागे मुख्यमंत्र्यांची खेळी असल्याचं बोललं जात आहे.

याआधी कर्जत-जामखेड मतदार संघातून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी चर्चा सुरु होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी नवीन चेहऱ्याला संधी देण्यापेक्षा जुन्या चेहऱ्याला उमेदवारी देत, निवडून आल्यास मोठं मंत्रिपद देण्याची घोषणा करत, खेळी खेळली आहे.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यातील संपूर्ण बारा जागा जिंकण्याचं भाजपने यावेळी उद्धिष्ट ठेवल्याचं बोललं जात आहे.