Home महाराष्ट्र भाजप सोबत जाण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने आधीच झाला होता, अजित पवारांचा गौप्यस्फोट

भाजप सोबत जाण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने आधीच झाला होता, अजित पवारांचा गौप्यस्फोट

0

प्राईम नेटवर्क : अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना अक्षरशः रडकुंडीला आनणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आता मोठा खुलासा केल्याचं बोललं जात आहे. टीव्ही ९ या वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार सध्या अजित पवारांना बारामतीचे त्यांचे कार्यकर्ते भेटायला येत आहेत. अशावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांपुढे एक गौप्यस्फोट करायला सुरुवात केली आहे.

अजित पवार बारामतीतील कार्यकर्त्यांना म्हटले की, भाजपला पाठिंबा द्यायचा हे पक्षाच्या बैठकीत आधीच ठरलं होतं. शिवसेनेसोबत न जाता भाजपला सरकार बनवण्यास पाठिंबा द्यायचा असा वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या बद्दल सर्वांना माहिती होती, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी मनधरणी करत आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भाजप सोबत जाण्याच्या विचाराशी सहमत होते, तर नवाब मलिक हे मुस्लिम समुदाय भाजपच्या विरोधात असल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार होते असं चित्र आता समोर येत आहे.

अजित पवार यांनी मात्र वेळ आल्यावर आपण आपल्या सोयीची भूमिका घेऊ हे आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र आता अजित पवार असा काही निर्णय घेऊ शकतात, किंवा घेतील अशी शंका शरद पवारांना या आधी होती का ? आणि त्यावर शरद पवारांनी काय उपाय योजना केली होती, हे मात्र समजू शकलं नाही.

दरम्यान शनिवारी राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

हे सुद्धा वाचा :

“पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न मिटला. सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन!” : शदर पवारांचं काम झालं सोपं

अजित पवारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात नेमकं काय होतं, सुप्रीम कोर्टात सत्य आलं समोर