Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना मोठी किंमत मोजावी लागेल : शरद पवार

मुख्यमंत्र्यांना मोठी किंमत मोजावी लागेल : शरद पवार

0

सगळीकडे आघाडीत बिघाडी झालेली असल्याचे वृत्त असताना एक खळबळजनक वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल असे बैठकीमध्ये बोलल्याचे वृत्त Tv9 मराठी वाहिनीने दिले आहे.

या वृत्तानुसार प्रशासकीय अधिकारी अजोय मेहता यांच्याकडून एकही सूचना ऐकून घेतली जाणार नाही असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून सांगण्यात आल्याचे समजते. नाराज झाले सनदी अधिकारी हे विरोधी पक्षाला सारकरची गोपनीय माहिती पुरावतील आणि याची मोठी किंमत मुख्यमंत्री उद्धवजीना मोजावी लागेल असे शरद पवार म्हणाले.

अजोय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत आधीपासूनच कुरबूर पाहायला मिळत होती. अजोय मेहता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर उघड उघड बोलत, अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं होतं.

दरम्यान राज्यात पुन्हा एकदा सुरू झालेल्या टाळेबंदीची शरद पवार यांनाही कल्पना नाही. आघाडी सरकार मधल्या काही मित्रपक्षांनी पुन्हा सुरू झालेल्या टाळेबंदीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काही मंत्र्यांनी राज्यात प्रशासकीय अधिकारीच राज्य चालवतात अशा जाहीर प्रतिक्रिया दिल्यात. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची काल (3 जुलै) बैठक झाली.