Home महाराष्ट्र चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार: देवेंद्र फडणवीस

चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार: देवेंद्र फडणवीस

0
devendra fadnavis

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत म्हणाले की, “चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार. सरकार आपलेच येणार आहे. भाजप वगळता कोणतेही सरकार होऊ शकत नाही. तुम्ही मुंबईत थांबू नका, इथून निघून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा अन् त्यांचं दु:ख हे आपलं दु:ख असल्याचं मानून जोमाने कामाला लागा.” त्याच बरोबर ‘पुढचे दोनतीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावरच तुम्ही दिसले पाहिजे. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल यावर जातीने लक्ष द्या.’ असे आदेशही त्यांनी दिले

या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सर्व माजी मंत्री उपस्थित होते. दरम्यान ‘सत्तास्थापनेबाबत येत असलेल्या कोणत्याही बातम्यांनी तुम्ही विचलित होऊ नका. योग्यवेळी योग्य निर्णय होईल.’ असंही फडणवीस म्हणाले.