Home महाराष्ट्र शिवसेनवकडून मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याची राज्यपालांकडे अजब मागणी

शिवसेनवकडून मारहाण झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याची राज्यपालांकडे अजब मागणी

0

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र काढल्यामुळे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. यात मदन शर्मा यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली. म्हणून मदन शर्मा यांनी काल अर्थात मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी व्यक्त केली. तसेच आजपासून आपण भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच असणार असे वक्तव्य मदन शर्मा यांनी केले.

मीडिया न्यूजनुसार या प्रकरणात कारवाई केली जाईल असे आश्वासन राज्यपालांनी मदन शर्मा यांना दिले. तसेच याबाबत केंद्राशी बोलणी करू असेही राज्यपाल म्हणाले. याबद्दलची माहिती मदन शर्मा यांनी स्वतः राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजभवन हे सरकारविरोधी कारवायांचे केंद्र बनले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मदन शर्मांना मारहाण कारणाऱ्यांपैकी अटक करण्यात आलेल्या ६ जणांना जामीन मिळाला होता. मात्र काल रात्री पोलिसांनी त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.