Home महाराष्ट्र हिरामण तिवारी यांना मारहाण करून मुंडन करणाऱ्या चार शिवसेना कार्यकर्त्यांना अटक!

हिरामण तिवारी यांना मारहाण करून मुंडन करणाऱ्या चार शिवसेना कार्यकर्त्यांना अटक!

0

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अगदी झपाट्याने व्हायरल झाला होता, ज्यात उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहीणाऱ्या हिरामणी तिवारी याचे काही शिवसैनिकांनी मुंडण करून मारहाण केली होती. या प्रकरणातील चार मुख्य आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हिरामण तिवारी यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीविरोधात ट्रक टर्मिनस पोलिसांत समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मीडिया रिपोर्ट नुसार सोमवार २३ डिसेंबर मुंबईतल्या वडाळा येथे हिरामण तिवारी यांचं काही शिवसैनिकांनी मुंडण करून त्यांना मारहाण देखील केली. शिवसैनिकांच्या मते हिरामण तिवारी यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती आणि म्हणूनच जाब विचारत शिवसेना कार्यकर्त्यांनी तिवारी यांना चोप देत कायदा हाती घेतला.