Home महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा कंगणाला पाठींबा; संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ!

उच्च न्यायालयाचा कंगणाला पाठींबा; संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ!

0

काही दिवसांपूर्वी पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच तिला मुंबई मध्ये परत येऊ नको असेही बोलण्यात आले होते.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी कंगनाला मंगळवारी दिली. तसेच, बेकायदेशीर कारवाई केल्याने पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा दिली.

कंगना बोलली की, महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असून नुकसान भरपाई म्हणून पालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कंगनाने याचिकेत केली आहे.

तसेच न्यायालयात बाजू मांडत असतांना कंगनातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात एक डीव्हीडी सादर केली. त्यात खासदार संजय राऊत यांचे एक भाषण रेकॉर्ड केलेले आहे. त्या भाषणात राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचा दावा वकिलांनी केला. त्यामुळे संजय राऊत हे मी अस काही बोललोच नाही आणि ही डीव्हीडी बनावट आहे असं बोलू शकतात म्हणून याचिकेमध्ये संजय राऊत यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, असे न्यायालयाने म्हटले.