Home महाराष्ट्र “हिंमत असेल तर जनादेश तपासा व पुन्हा निवडणूक घ्या. आम्ही एकटे असलो...

“हिंमत असेल तर जनादेश तपासा व पुन्हा निवडणूक घ्या. आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरून उरू!”

0

नवी मुंबई येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. “२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं बाळासाहेबांनी वचन दिलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करेल असं ते म्हणाले होते का?” असा सरळ सवाल फेकत फडवीसांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली.

ABP माझाच्या रिपोर्ट नुसार ‘हिंमत असेल तर जनादेश तपासा व पुन्हा निवडणूक घ्या. तिन्ही पक्षांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्ष समर्थ आहे. एकटे असलो तरी आम्ही तुम्हाला पुरून उरु’ असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्याचबरोबर फडणवीस म्हणाले, “सावरकरांची बदनामी करणाऱ्याच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालून दाखवा अन्यथा सत्तेसाठी तुम्ही लाचार असल्याचं कबूल करा” अशी फडवीसांनी जोरदार टीका शिवसेनेवर केली.