Home महाराष्ट्र आपल्या राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पेक्षा महान : शरद पवार

आपल्या राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पेक्षा महान : शरद पवार

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार म्हणाले की, ” जगातील ऑक्सफर्ड सारख्या ख्यातनाम आणि दिग्गज शिक्षण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द केल्या आहेत आपल्याकडे सुद्धा IIT ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे असले तरी आपले राज्यपाल महोदय काही परीक्षा रद्द करण्याच्या तयारीत दिसत नाहीत, अर्थात त्यांचे ज्ञान हे या सर्वांच्या पेक्षा मोठे असले पाहिजे. ” , असा टोला लगावत राज्यपाल कोशियारी यांची खेचण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळाच्या पाहणी साठी शरद पवार हे दोन दिवस कोकणच्या पाहणी दौऱ्यावर आहेत, यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यामधील राज्य विरुद्ध राज्यपाल या संघर्षावर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली आहे.

पवारांच्या मते पदवीधर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विचार केला तर जगातील ख्यातनाम विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द केला असून याच धरतीवर खासगी विद्यालये सुद्धा असाच निर्णय घेतील असे असताना जर सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला तर त्यात काय चुकीचे आहे.

यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुनही टोलेबाजी केली. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल , असे शरद पवार म्हणाले.