Home महाराष्ट्र वेळीच तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा अन्यथा कार्ड होईल Invalid…

वेळीच तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा अन्यथा कार्ड होईल Invalid…

0

३० सप्टेंबर आधी तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड कायमचं बंद होऊ शकतं. इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर पॅन कार्ड १ ऑक्टोबरपासून बाद होऊ शकतं अशी माहिती मिळत आहे. याआधी जुलै मध्ये बजेटच्या वेळीच पॅन आधारला जोडण्या बाबतच्या नियमांत बदल करण्याची घोषणा केली गेली होती. तेव्हा CBDT ने पॅन ला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर घोषित केली होती. आणि हो जोपर्यंत तुम्ही पॅन आधार कार्डाशी लिंक करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही तुमचं पॅन कार्ड व्यवहारांसाठी वापरू शकणार नाही.

बाद होईल म्हणजे नक्की काय होणार?
बाद होईल अर्थात तुमचं कार्ड Invalid होईल. याचा अर्थ तुमच्याकडे पॅन कार्ड नाहीच असे ग्राह्य धरले जाइल.

असे करा लिंक…
पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं अकाऊंट नसेल तर रजिस्टर करा. कार्ड जोडण्याची प्रोसेस सांगितल्या प्रमाणे पूर्ण करा. किंवा SMS द्वारे देखील पॅन कार्ड आधारशी लिंक करता येईल. आयकर विभागानं सांगितल्या प्रमाणे 567678 किंवा 56161 वर SMS पाठवून तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता. दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरळीत सोपे व जलद होण्यासाठी केलेली ही तरतूद असून ती वेळीच पूर्ण करा…