Home महाराष्ट्र नाशिक पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाजानदेश यात्रेची सांगता

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाजानदेश यात्रेची सांगता

0

१ ऑगस्ट पासून चालू असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज दिनांक १९ सप्टेंबर हा शेवटचा दिवस असून नाशिक मध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. काल सायंकाळी नाशकात हजर झालेल्या महाजानदेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे नाशिककरांचे आभार मानले. आजच्या समारोप सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार असल्याने या जाहीर सभेत भाजपाच्या प्रचाराची मोदींच्या हस्ते आरंभ होणार असल्याचे बोलले जात आहे.

१२ वाजता पंचवटीतील तपोवन येथे भरणार असलेल्या या सभेसाठी सदर परिसरात बुधवारी सायंकाळीच एनएसजी कमांडोज् ची फौज तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय वितरण मंत्री रावसाहेव दानवे, समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंढे, उदयनराजे भोसले या सर्वांसह जवळपास अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी नाशिक शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कमांडो देखील सभास्थळी असणार आहेत.