Home महाराष्ट्र मराठा आरक्षण : आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी

मराठा आरक्षण : आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी

0

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थगिती उठवण्यासाठी आंदोलने होत आहेत. आज ७ नोव्हेंबरला पंढरपूर येथून मराठा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मीडिया न्यूजनुसार आज सकाळी ११ वाजता नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मराठा संघटना या मोर्चाला सुरुवात करणार आहेत. आंदोलकांमधील केवळ १० ते १५ लोकांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यास परवानगी मिळणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी १२ वाजेपासून स्थानिक प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच मोर्चाच्या बंदोबस्तासाठी ६०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान मोर्चा रद्द करण्यासाठी शुक्रवारी रात्री स्थानिक प्रशासन व मराठा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीतून एक प्रस्ताव तयार केला गेला मात्र मोर्चा मागे घेतला गेला नाही. मीडिया न्यूजनुसार आंदोलक नामदेव पायरीपासून शहर पोलीस स्टेशनपर्यंत पायी मोर्चा नेणार आहेत व पोलीस स्टेशनपासून मंत्रालयापर्यंत त्यांना पोलीसांच्या वाहनात मंत्रालयापर्यंत नेण्यात येणार आहे. सध्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरु असल्याने शासनाच्या वतीने अधिकारी या आंदोलकांशी चर्चा करणार आहेत.