Home महाराष्ट्र मुंबई धक्कादायक बातमी, मुंबई महापालिका उपआयुक्तांचे कोरोनाने निधन

धक्कादायक बातमी, मुंबई महापालिका उपआयुक्तांचे कोरोनाने निधन

0

संपूर्ण मुंबई सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. पोलिस, आरोग्य कर्मचारी त्याचसोबत नेते मंडळी देखील कोरणाच्या लागणी पासून बचावले नाहीत. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, मुंबई महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचं कोरोनानं निधन झालंय.

मुंबई महापालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याचं कोरोनानं निधन होणं ही अतीशय चिंतेची बाब आहे.शिरीष दिक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सरु होते. मात्र, मंगळवारी दीक्षित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरिष दीक्षित महापालिकेच्या विशेष पाणी पुरवठा प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता होते.

दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या साथकाळात कार्यरत असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान साहाय्य येणार आहेत. फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त परमनंट नव्हे तर काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत देण्यात येईल.

नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर असं सहाय्य मिळणार आहे.

Covid 19 च्या साथीदरम्यान सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरवणारी ही देशातली पहिली महापालिका असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे.