Home महाराष्ट्र मुंबई मुंबई लोकल पुन्हा पहिल्यासारख्या खचाखच, कोरोना संसर्ग धोका प्रचंड वाढला

मुंबई लोकल पुन्हा पहिल्यासारख्या खचाखच, कोरोना संसर्ग धोका प्रचंड वाढला

0

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता या गाड्यांमध्ये लॉकडाऊन पूर्वीसारखीच गर्दी होत असून सगळ्या गाड्यांमध्ये तुडूंब गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची प्रचंड भीती व्यक्त केली जात आहे. देशात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या ही मुंबईत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे आता ही गर्दी रोखायची कशी असा प्रश्न राज्य सरकारपुढे आहे.

आज सुद्धा रेल्वेची ही परिस्थिती कायम होती. आज दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत लोकल गाडी निघाली तेव्हा जी गर्दी होती तीच गर्दी गाडीने ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यावर ही कायम होती.

कोरोना संक्रमण लाॅकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती जर लाॅक डाऊन काळात रेल्वे सेवा सुरु ठेवली असती तर नागरीकांनी नियम न पाळता रेल्वेनं प्रवास करुन करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढवला असता. पण अत्यावश्यक सेवेत काम करणारे असे लाखो कर्मचारी आहेत जे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात राहतात त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कामावर येणं कठीण होतं आता जेव्हा त्यांच्यासाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली तेव्हा झालेली गर्दी बघून अंगाचा थरकाप उडत आहे.