Home महाराष्ट्र राष्ट्रवादीला आणखी एक झटका: संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादीला आणखी एक झटका: संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

विधानसभेच्या रणधुमाळीत जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. तरीही सेना आणि भाजपची मेगाभरती थांबायचं नाव घेत नाही. निवडणूक अगदी तोंडावर आली असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील पुढील काही दिवसांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी मीडिया न्यूज समोर आली आहे.

तुम्हाला हे आवर्जून माहीत असायलाच हवं की यापूर्वी संजय पाटील २००९ मध्ये लोकसभेत ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांनी त्यांचा पराभव केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचे प्राबल्य असल्यामुळे संजय दिना पाटील यांच्या सेनाप्रवेशाने पक्षाला फायदा होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या राजकारणाच्या खेळीत कुणाला लाभ होणार आणि कुणाला तोटा हे तर वेळच सांगेल.