Home महाराष्ट्र आम्हाला कुणीही पाठींबा मागितला नाही. त्यामुळे शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून...

आम्हाला कुणीही पाठींबा मागितला नाही. त्यामुळे शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही: शरद पवार

0
sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांच्याविषयी चाललेल्या चर्चा थांबविण्याकरिता स्पष्टीकरण दिले. “राज्यात परतणार नाही” असे सांगत त्यांनी त्यांच्याविषयी चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मीडिया न्यूज नुसार शरद पवार म्हणाले की “सध्यातरी आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. पण भविष्यात काय होईल, काही सांगू शकत नाही. आम्हाला अद्याप पाठिंब्यासाठी कुणीही विचारलेलं नाही. त्यामुळे त्याविषयी काही माहीत नाही. शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही”

या पत्रकार परिषदेत अशीही चर्चा झाली की सोनिया गांधी सोबत लवकरच परत एकदा बैठक होणार आहे.