Home महाराष्ट्र राजकारणातले कट्टर दुश्मन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीच्या जोडीत कोणाची...

राजकारणातले कट्टर दुश्मन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीच्या जोडीत कोणाची संपत्ती आहे जास्त?

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढत असलेले सर्व नेते एकीकडे आणि परळी मतदार संघातील मुंडे बहीण-भावंडं एकीकडे आहेत. कारण यांच्या लढतीची चर्चा राज्यभर आहे. एकाच कुटुंबातले हे बहीण भाऊ कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात लढतात. एवढंच नाही तर बहीण भाऊ असले तरी राजकारणात ही जोडी एकमेकांची पक्की वैरी आहे. प्रत्येक गोष्टीत यांची चढाओढ चालू असते. अगदी विकासकामांपासून तर संपत्ती पर्यंत कशातही! गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बहीण-भावांच्या संपत्ती बद्दल माहिती समोर आली आहे.

पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच अटीतटीची लढत असते. सबंध महाराष्ट्राची त्यांच्यावर नजर टिपलेली असते की यंदा कोण बाजी मारणार. यंदा संपत्तीच्या बाबतीत बहिणीने बाजी मारली आहे. पंकजा मुंडे या त्यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्यापेक्षा संपत्तीने पुढे आहेत. मीडिया न्यूज नुसार शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचं आपल्या शपथपत्रातून सांगितलं. पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण संपत्ती ५ कोटी ५४ लाख ५४ हजार ७२ रुपये असून धनंजय मुंडे यांची संपत्ती २ कोटी ६५ लाख ६१ हजार २४४ रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलंय. अर्थात संपतीच्या बाबतीत बहीण भावापेक्षाही वरचढ आणि उजवी आहे असं दिसतंय. मात्र विकासकामांच्या बाबतीत कोण वरचढ व उजवा ठरेल याचा निर्णय मात्र जनताच घेऊ शकते.