Home महाराष्ट्र पंकजा मुंडे पहिल्यापासून भाजपच्या होत्या, आहेत आणि पुढेही राहणार आहेत: चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे पहिल्यापासून भाजपच्या होत्या, आहेत आणि पुढेही राहणार आहेत: चंद्रकांत पाटील

0

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेल्या मोठ्या पोस्टनंतर सबंध महाराष्ट्रात एकच चर्चा पेटली. या १२ तारखेला पंकजा मुंडे पक्ष सोडण्याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. काही वृत्तपत्रांनी ही अफवा असल्याचाही दावा केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे कुठेही जाणार नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले. त्याच बरोबर पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे पहिल्यापासून भाजपच्या होत्या, आहेत आणि पुढेही राहणार आहेत.” असं चंद्रकांत पाटील यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

याची सुरुवात एका पोस्ट पासून झाली; “आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. पुढील मार्ग व दिशा ठरवण्यासाठी, आपली शक्ती काय व लोकांची अपेक्षा काय हे पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वजण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर या.” अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक पोस्ट शेअर करून सबंध राज्याला बुचकळ्यात टाकलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही असे सांगितले आहे. मात्र स्वतः पंकजा मुंडे यांच्या मनात नक्की काय चालू आहे हे अद्याप सांगता येणार नाही. आता येत्या १२ तारखेला पंकजा काय सांगणार आहेत याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.