Home महाराष्ट्र महत्वाची बातमी; राज्यात लवकरच होणार १२,५०० जागांची पोलीस भरती!

महत्वाची बातमी; राज्यात लवकरच होणार १२,५०० जागांची पोलीस भरती!

0

आज १६ सप्टेंबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात लवकरच १२,५०० जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. या भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. पोलीस खात्यात जाण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता पोलीस खात्यावर ताण वाढत असलेला दिसून येत आहे. अशातच बऱ्याच पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत असल्याने नवीन भरतीची गरज निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा विचार करूनच साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दलची माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली.

या भरतीची माहिती अनिल देशमुख यांनी २ महिन्यांपूर्वीच आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली होती.