Home महाराष्ट्र पुण्याचे महापौर कोरोना पॉसिटीव्ह, अजित पवार आणि अनेक दिग्गजांना सुदधा धोका!

पुण्याचे महापौर कोरोना पॉसिटीव्ह, अजित पवार आणि अनेक दिग्गजांना सुदधा धोका!

0

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून ती पॉझिटिव्ह आली आहे ,त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली. मी उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.
मोहोळ वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतूदीपासून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोहोळ यांनी कामाचा धपाटा सुरूच ठेवला होता.

ट्वीट करुन महापौर मोहोळ यांनी सांगितले की, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”

दरम्यान पुण्यातील विधान भवन येथे काल करोनाच्या परिस्थितीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या सारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. आता मोहोळ कोरोना पॉसिटीव्ह आल्यामुळे ह्या सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.