Home आरोग्य आश्चर्यकारक! पुण्यातील १०० वर्षीय आजींनी केली कोरोनावर मात

आश्चर्यकारक! पुण्यातील १०० वर्षीय आजींनी केली कोरोनावर मात

0

कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असतांनाच पुण्यातील एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणाऱ्या एक १०० वर्षीय आजी कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर या आजींना दोन दिवस अन्न पाणी घेता आले नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत होती व त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. पण ससून रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते व घरची परिस्थिती बिकट असल्याने आजींना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेणेही परवडणारे नव्हते. त्यामुळे खराडी रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले असे सकाळच्या मीडिया न्यूजवरून समजले.

आजींनी कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबाची व इतर नातेवाईकांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील तीन जण पोसिटीव्ह व दोन जण निगेटिव्ह आले. या रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. आजींच्या शरीराने गोळ्यांना व उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आजी लवकर बऱ्या झाल्या असे खराडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. या शंभर वर्षीय आजी जेव्हा कोरोनावर मात करून बाहेर पडल्या तेव्हा रुग्णालयातील स्टाफने टाळ्या वाजवून आजींना निरोप दिला.