Home महाराष्ट्र पुणे पुण्यात नकली नोटा प्रकरणाचा सूत्रधार शेख अलिम बोलतो मी निजामाचा वंशज!

पुण्यात नकली नोटा प्रकरणाचा सूत्रधार शेख अलिम बोलतो मी निजामाचा वंशज!

0

पुण्यात नकली नोटा प्रकरणाचा सूत्रधार शेख अलिम बोलतो मी निजामाचा वंशज!

पुण्यमधील बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार लान्स नाईक शेख अलीम समद गुलाब खान हा आपण हैद्राबाद येथील निजामाचा वंशज असल्यामुळे आपल्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे कारण देत असे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली असून त्याच्या अशा खुलाशाने अनेक जण त्याच्या जाळ्यात अडकत असत. तसेच त्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्यात निजाम्याच्या काही प्रतिमादेखील लावल्या होत्या.

याप्रकरणी अटक केलेल्या सहा जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
लान्स नाईक अलीम याच्यासह सुनील बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दुल गणी रहेमत्तुल्‍ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) या सर्वांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

आरोपी अलीम खान याने चिल्ड्रन्स बँकेच्या नोटांवर खर्‍या नोटा लाऊन त्याची थप्पी भाड्याने घेतलेल्या बंगल्यात ठेवली होती. त्याच्यावर वर्तमानपत्र ठेवून तो व्हिडिओ बनवत होता. ते व्हिडिओ एजंटाद्वारे ट्रस्ट अधिकारी, कंपन्या व इतर मध्यस्थांना दाखवून आपल्याकडील रोख रक्‍कमेची खात्री पटवत असे. त्यासाठी एंजटांना कमिशन मिळत होते. आरोपी अलीम खान याने मागील 6 महिन्यांत अशा प्रकारे 25ते 30 व्हिडिओ बनवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करीत आहेत.