Home महाराष्ट्र पुणे छ.शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा राज्याला मिळाला !

छ.शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा राज्याला मिळाला !

0

प्राईम नेटवर्क: सिंहगड शब्द कानावर आला की त्याक्षणी डोळ्यासमोर उभा राहतो तो सिंहासारख्या तानाजी मालुसरे यांचा अद्वितीय पराक्रम..याच युध्द प्रसंगात स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. सिंहगडावरचा हा पराक्रम इतक्या वर्षांनतरही आपल्या सर्वांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय व स्वराज्यप्रेमाचे स्मरण केल्याशिवाय राहत नाही. त्याच सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. ते सुरु असताना मालुसरे यांची देह समाधी मिळाली आहे. छत्रपती शिवरायांनी मालुसरे यांची समाधी बांधली होती. यामुळे,छ.शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य असा ठेवा या समाधीच्या स्वरुपात राज्याला मिळाला आहे.

पुरातत्व विभागाच्या परवानगीने पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बसविण्यासाठी चौथरा काढून तेथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते. पुतळा बाजूला काढून त्याच्या काँक्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. तर, पुतळ्याशेजारी एका चौकोनी दगडावर समाधीचा शिरोभाग होता. ती आतापर्यंत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती. वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरोभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांनी मूळ समाधी असल्याचे समजले.

अभूतपूर्व योगायोग म्हणजे नरवीर धारातीर्थी पडले ते स्फूर्तीस्थळ त्यांच्या ३४९ व्या पुण्यतिथी आधी प्रकाशझोतात आले आहे. छत्रपती शिवरायांनी स्वत: ही समाधी बांधून घेऊन समाधीचे दर्शन घेतले होते. मालुसरे यांच्या मृत शरीराला उमरठ येथे अग्नी दिला तिथे अग्नी समाधी आहे.