Home महाराष्ट्र पुणे पाच तोळे सोन्याचा मास्क घालून पिंपरीच्या गोल्डन मॅन चा शहरभर फेरफटका

पाच तोळे सोन्याचा मास्क घालून पिंपरीच्या गोल्डन मॅन चा शहरभर फेरफटका

0

पिंपरी चिंचवडचे ‘गोल्डन मॅन’ म्हणजेच शंकर कुऱ्हाडे हे चक्क सोन्याचा मास्क घालून शहरभर मिरवत आहेत. विशेष म्हणजे आधीच पाच बोटात अंगठ्या, मनगटामध्ये सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याचा गोफ आणि त्यात आता या मास्कची भर पडलीये.लोक त्याविषयी चर्चा करत आहेत पण या चर्चांना ते भीक घालायला तयार नाहीत.

कुऱ्हाडेना सोन्याच्या दागिन्यांचा प्रचंड मोठा शौक. त्यातच त्यांनी सोशल मिडियावर एक व्यक्ती चांदीचा मास्क घालून फिरतानाची क्लिप पाहिली. मग आपण सोन्याचा मास्क का बनवू नये, असे त्यांना वाटले आणि त्यांनी तो बनवून वापरायला सुरुवात सुद्धा केली.साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये त्यांनी खर्ची घातलेत.

यांना पाहून मनसेचे गोल्डन मॅन ची आठवण नक्की येते, पुण्यातील पहिला गोल्डन मॅन म्हणजे दिवंगत आमदार रमेश वांजळे. वांजळे हे पहिलवान होते. राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली सोन्याची हौस पूर्ण करायला सुरवात केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांचा आकार आणि वजन दिवसेंदिवस वाढत गेले. त्यातून त्यांची चर्चा होऊ लागली. धिप्पाड देह, पहिलवानी शरीर, दाढी आणि त्यावर सोन्याचे वजनदार दागिने यामुळे वांजळे यांचा रुबाब लगेच सामान्यांच्या लक्षात येऊ लागला. त्यांची क्रेझच निर्माण झाली. नंतर त्यांचे दुर्दैवाने निधन झाले.