Home महाराष्ट्र १२ विचा निकाल १५ जुलै पर्यंत लागणार तर १० विचा जुलै अखेरीस...

१२ विचा निकाल १५ जुलै पर्यंत लागणार तर १० विचा जुलै अखेरीस : वर्षा गायकवाड

0

तुम्हाला सुद्धा दहावी आणि बारावीच्या निकालाची उत्सुकता आहे तर मग, जरा इकडे लक्ष द्या. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्येही अनेक अडचणी येत आहेत. परिणामी यंदा निकाल प्रचंड उशीरा लागण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल, असे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरीही दुसरीकडे मात्र विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालासंदर्भातील सोशल मीडियाद्वारे उलट-सुलट माहिती नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, शालेय शिक्षण मंत्र्यांनी निकालाबाबत खुलासा केल्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

“साधारणत: दरवर्षी दहावीचा निकाल १० जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी लागतो. परंतु यंदा उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन निकाल लावण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्‍यता आहे.”, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी “सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.