Home महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोषारींच्या हस्ते साई श्रद्धा प्रतिष्ठानकडून मुंबईच्या डबेवाल्यांना सायकल वाटप

राज्यपाल भगतसिंग कोषारींच्या हस्ते साई श्रद्धा प्रतिष्ठानकडून मुंबईच्या डबेवाल्यांना सायकल वाटप

0

मुंबईतील डबेवाल्यांची सेवा बऱ्याच काळापासून अखंड चालत आली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांना मोठा फटका बसला. कार्यालये बरेच दिवस बंद असल्याने अनेक डबेवाल्यांच्या काम गेले. तसेच मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने डबेवाल्यांना डबे पोचवायला अडचण येत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज १९ ऑक्टोबरला डबेवाल्यांना सायकल्सचे वाटप केले.

लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या श्रुभ्रांशू दीक्षित यांनी डबेवाल्यांच्या अडचणी लक्षात घेऊन डबेवाल्यांना सायकलींचे वाटप करण्याचे ठरवले. हा कार्यक्रम त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात घडवून आणला. या कार्यक्रमाला मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक रूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.