Home महाराष्ट्र सत्तेसाठीची धावपळ संजय राऊतांना अखेर महाघात पडली, ऍन्जोप्लास्टी शस्त्रक्रियेवर बेतलं

सत्तेसाठीची धावपळ संजय राऊतांना अखेर महाघात पडली, ऍन्जोप्लास्टी शस्त्रक्रियेवर बेतलं

0
sanjay raut

प्राईम नेटवर्क : सत्तेसाठीची धावपळ संजय राऊतांना अखेर महाघात पडली आहे, गेल्या काही दिवसां पासून टेलिव्हिजन पडदा व्यापलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांना सत्तेची धावपळ चांगलीच महागात पडल्याचं दिसतंय, गेल्या दोन दिवसां पासून छातीत दुखू लागल्या मुळे संजय राऊत यांना आज मुंबईच्या लीलावती रुग्नालयात भरती करण्यात आलं. तब्ब्ल दोन दिवस त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यांना हे दुर्लक्ष चांगलंच महागात पडलं, राऊत यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले, त्यांची ऍन्जोग्राफी झाल्यावर, त्यांच्यावर तात्काळ ऍन्जोप्लास्टी देखील करण्यात आली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या एकाच उद्देशाने संजय राऊत जीवाचं रान करत असल्याचं सर्वांना पाहायला मिळालं, या काळात त्यांनी शरद पवारांसह अनेकांच्या गाठी भेटी घेतल्या, या धकाधकीच्या धावपळीत त्यांनी आपल्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं यावेळी पाहायला मिळालं,

हे हि वाचा :

शिवसेना जाईल का पुन्हा नांदायला सासरी, जाऊ बाई जोरात, सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडे पर्याय काय?

सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला पुन्हा निमंत्रण देण्यास नकार दिला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उशिरा पर्यंतचा त्यांचा पाठिंबा जाहीर न केल्यामुळे, शिवसेनेला त्यांची भूमिका मांडता आली नाही, राज्यपालांनी आता, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं आहे, यावेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्यासह, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे वरिष्ठ नेते उपस्थित होते, यावेळी आपण पुन्हा येऊ असा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिल्याचं समजतं.