Home महाराष्ट्र राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

0

केंद्र सरकारने देशभरातील नववी ते बारावीच्या शाळा २१ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठीची SOP देखील केंद्र सरकारने जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली.

यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या संस्थाचालक महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय दिवाळीनंतर घेतल्या जाईल असे सांगण्यात आले. केंद्र सरकारने शाळा सुरू झाल्यावर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमावली बनवली आहे. मात्र राज्यातील कोरोनाबधितांचा वाढता आकडा बघता नियमावलीचे पालन करूनही कोरोनाचा प्रसार थांबवणे अवघड असल्याने राज्य शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.