Home महाराष्ट्र राज्यातील शाळा १ जुलै पासून सुरू करणार : अजित पवार

राज्यातील शाळा १ जुलै पासून सुरू करणार : अजित पवार

0

कोरोना विषाणूच्या झटक्यांनातर मागच्या वर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या मात्र येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचं काय असा प्रश्न सबंध पालक वर्गाला पडलेला आहे. शाळा सुरू झाल्या तरी त्यांचे स्वरूप काय असेल, सोशल डिस्टन्स चे पालन होणार आहे का, शाळा डिजिटल स्वरूपाच्या असतील का असे नानाविध अनेक प्रश्न सद्या सर्वांच्या डोक्यात आहेत. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक वर्षात शाळा लवकर सुरू होणारचं अशी भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारसुद्धा नवीन शैक्षणिक वर्ष १ जुलै पासून सुरू करण्याच्या हालचालीत आहे.

अजित पवार यांनी सांगितलेल्या या माहितीवरून तूर्तास तरी जून महिन्यात शाळा सुरू होणार नाही या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक , विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांना तूर्तास अराम मिळाला आहे.

१ जुलैपासून शाळा सूर करण्याचा विचार आहे मात्र अद्याप तसा कुठला निर्णय झालेला नाही असे सुद्धा अजित पवार म्हणाले. जरी १ जुलै ला शाळा सुरु झाल्या तरी पहिले काही दिवस बुडण्याची शक्यता आहे. म्हणून मुलांच्या ख्रिसमस, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करून दिवस भरून काढण्याची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान शाळा सुरु करण्यावर चर्चा झाल्या आहेत. अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरु आहे. मात्र जूनमध्ये शाळा सुरु झाल्यातर आम्ही मुलांना शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकापुढे होता. त्याचे निराकरण झाले असून १५ जुलैपर्यंतही शाळा सुरु होतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.