Home महाराष्ट्र सिल्व्हर ओक ला जाऊन राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट: भेटीचं कारण?

सिल्व्हर ओक ला जाऊन राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट: भेटीचं कारण?

0

राज्यातील भाजप शिवसेना यांच्यातील हमरी तुमरी काही संपत नाहीये. परिणामी सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाहीये. राज्यात अशी परिस्थिती असतांनाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज भेट घेतली आहे. या भेटीचे कारण जरी अद्याप समोर आले नसले तरी साहजिकच चर्चेला उधाण येणारच.

मिळालेल्या माहिती नुसार ही भेट केवळ १० मिनिटांची होती. केवळ दहा मिनिटे चर्चा करून राज ठाकरे परतले. यावेळी राज्याच्या परिस्थितीवरच प्रामुख्याने चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं आहे. नक्की काय बोलणं झालं आणि या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मटाच्या रिपोर्ट नुसार येत्या सोमवारी शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणांची उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.