Home महाराष्ट्र शिवसेना -भाजपची पुन्हा युती होऊ शकते; आठवलेंच्या फॉर्म्युल्याला राऊतांचा होकार

शिवसेना -भाजपची पुन्हा युती होऊ शकते; आठवलेंच्या फॉर्म्युल्याला राऊतांचा होकार

0

सत्तेचा वाद शिगेला गेल्याने दरम्यान शिवसेनेने आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेना एनडीएमधून पण वेगळी झाली आहे. आता शिवसेना-भाजपची पुन्हा एकदा युती होऊ शकते याबाबत रामदास आठवले यांनी माहिती दिली.

रामदास आठवले म्हणाले, “मी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मी त्यांना एक नवीन फॉर्म्युला सुचवला. ३ वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर २ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल.भाजप तयार असेल तर शिवसेना याबद्दल विचार करेल असे त्यांनी मला सांगितले.मी आता याबद्दल भाजपशी बोलणार आहे.” असा त्यांनी युतीचा नवीन फॉर्म्युला देखील सांगितला. अशातच आज संजय राऊत यांनी एनडीएतून शिवसेना बाहेर पडली म्हणजे युपीएत जाणार नाही असं विधानही केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात यापुढेही बोलणी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. यावर राजकीय वर्तुळात एकंदरीत राऊत यांनी अप्रत्यक्षपने होकारच दिला अशी चर्चा आहे.