Home महाराष्ट्र फडणवीस चिपळ्या वाजवणे बंद करा, सामना अग्रलेखातून घणाघात

फडणवीस चिपळ्या वाजवणे बंद करा, सामना अग्रलेखातून घणाघात

0

शिवसेनेच्या मुखपत्र सामना मधून फडणवीस यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे, “राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. पण शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?”, असं परखडपणे सामना अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

अंतर्विरोधाच्या चिपळ्या या शीर्षकाखाली सामना अग्रलेखात फडणवीस यांच्या घणाघात टीका करण्यात आली असून, फडणवीसांच्या ” सत्तेतील तिन्ही पक्षात मतभेद आहेत, पडद्यामागे बरेच काही सुरू आहे, शरद पवार मातोश्री वर जातात काय, विनवणी करतात काय” या बातम्या अगदी तथ्यहीन असून फडणवीसांनी अशा विरोधाच्या चिपळ्या वाजवणे आधी बंद करायला हवे असे म्हटले आहे.

पुढे अग्रलेखात म्हटले आहे की, “देवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून हळूहळू रुळावर येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारले हे बरे झाले. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आणि हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधातूनच पडेल, असे विरोधी पक्षनेते सांगतात. विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, सरकार पाडण्याची घाई नाही, पण सरकार अंतर्गत विरोधातून पडेल असा गोंधळी विचार त्यांनी मांडला आहे”.