Home महाराष्ट्र धक्कादायक : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लपवलेले सरकारी आकडे आले समोर; महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक...

धक्कादायक : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लपवलेले सरकारी आकडे आले समोर; महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या!

0

२०१५ पासून भारतात मोदी सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर होत नसल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांकडून आणि सामाजिक संस्थांकडून केला जात होता. परिणामी लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये २०१६ ची आकडेवारी समोर आली व आता २०१८ मधील शेतकरी आत्महत्यांचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. दुःखाची बाब म्हणजे पुन्हा एकदा असे निष्पन्न झाले की महाराष्ट्रातच इतर राज्यांच्या तुलनेत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ABP माझा च्या एका रिपोर्टनुसार २०१८ या वर्षात ९ हजार ५२८ पुरुष तर ८२१ महिलांनी आत्महत्या केली आहे. देशभरात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी तब्बल ७.७% आत्महत्या या महाराष्ट्रातील बळीराजाच्या आहेत.

आत्महत्यांच्या बाबतीत तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून याउलट देशातील काही राज्यांनी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसल्याची नोंद काही राज्यांनी केली ज्यात गोवा, मेघालय, उत्तराखंड, ओरिसा, बिहार व पश्चिम बंगाल अशा काही राज्यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये देशभरात ११ हजार ३७९ आत्महत्या झाल्या तर २०१७ मध्ये १० हजार ६५५ आत्महत्या झाल्या. यापैकी ५ हजार ९५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत तर ४ हजार ७०० आत्महत्या या शेतमजुरांच्या होत्या आणि दुर्दैव म्हणजे यातील ३ हजार ७०१ आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत.