Home महाराष्ट्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय!

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय!

0

आज दिनांक ८ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कृषी व हॉस्पिटल क्षेत्रांसाठी दिलासादायक असल्याचे मीडिया न्यूजमधून समजते. लोकमतच्या रिपोर्टनुसार या बैठकीत घेण्यात आलेले चार महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:

  • नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय झाला आहे. याच प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील कित्येक कुटुंब दारिद्र्य रेषेवर आणल्या गेले आहेत. या प्रकल्पासाठी ५२३ कोटींचा निधी उभारण्यात येणार आहे.
  • हॉस्पिटल क्षेत्रात दवाखाना उभारण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. Ease of doing business ची अंमलबजावणी करण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे
  • कृषिपंप धारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार
  • नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कुलगुरू आणि प्र कुलगुरू या पदांवर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करण्यात येणार असल्याचाही निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.