Home महाराष्ट्र आज ना उद्या मरायचे आहे मग कोरोनाला घाबरून काय उपयोग : उदयनराजे...

आज ना उद्या मरायचे आहे मग कोरोनाला घाबरून काय उपयोग : उदयनराजे भोसले

0

“कोरोना विषाणू हा सुद्धा अनेक विषाणू सारखाच आहे याचा उगाच बाऊ करणे सोडून द्यायला हवे, इतर विषाणूमुळे सुदधा मृत्यू होतं असतात त्यामुळे फक्त कोरोनामुळेच मृत्यू होतो असे काही नाही. ज्या प्रकारे स्वीडन सारख्या देशाने त्यांच्या नागरिकांना जाणूनबुजून कोरोनाला सामोरे करून रोग प्रतिकार शक्ती वाढवून घेतली अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा हा प्रयोग करायला हवा”, असे मत भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मांडले.

“कोरोना विषाणू नाही तर जगात तीन अब्ज विषाणू अस्तित्वात आहे त्यामुळे फक्त कोरोनाला उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही, आपण वस्तुस्तिथीला सामोरे जायला हवे. कोरोनावर लस केव्हा येईल हे कुणालाच सांगता येत नाही, आपल्याकडे ऑक्सफर्ड तज्ज्ञांच्या मदतीने पुणे येथे यावर प्रयत्न सुरू आहेत”

उद्यनराजेंच्या मते जेवढे मृत्यू हे वृद्धपकाळ किंवा आजारपण या सारख्या गोष्टीनी होतात त्यापेक्षा कैक पटीने मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात त्यामुळे त्यांनी शांत राहन्याचे आवाहन केले आहे, अर्थचक्र पुन्हा सुरू होत आहे गेलेले मजूर सुद्धा हळू हळू पूर्वपदावर येत आहेत. कोरोनाचा लढा निर्भयपणे करा असा त्यांच्या बोलण्याचा एकंदर आशय होता.

एकंदर आकड्यांवर नजर टाकल्यास आढळून येते की भारतात लॉकडाऊन लागू नसताना दिवसाला १२१४ रस्ते अपघात व्हायचे यामध्ये सरासरी २५ अपघात हे दुचाकीमुळे होत असायचे तर झालेल्या अपघातांपैकी ३७७ लोक हे मृत होत असत, एकंदर बघायला गेल्यास लॉकडाऊन नंतर अपघातांची संख्या ही कोरोना विषाणूने घेतली असा संदर्भ ढोबळमानाने लावता येईल, उद्यनराजेंच्या म्हणण्यानुसार वेळ आली तर जावी लागेलचं त्यामुळे कोरोना असो की अपघात न घाबरता सामोरे जायला हवे हे नक्की