Home महाराष्ट्र आज काका घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ तर पुतण्या काढणार भव्य मोर्चा

आज काका घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ तर पुतण्या काढणार भव्य मोर्चा

0

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटला असून आता महाविकासआघाडीचे सरकार हे निश्चित आहे त्या अनुषंगाने अर्थातच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील. त्या अनुषंगाने आज २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मिदुय रिपोर्ट नुसार या शपथविधीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांना देखील बोलावण्यात आले आहे. राज ठाकरे शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील की नाही हे संध्याकाळी कळेलच मात्र राज ठरे याचा मुलगा अर्थात अमित ठाकरे या सोहळ्यात नसणार आहे. करम जेव्हा काका म्हणजेच उद्धव ठाकरे इकडे शपथ घेत असतील तेव्हा त्यांचा पुतण्या म्हणजेच अमित ठाकरे त्यांच्या आयुष्यातील पहिल्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांची 14 महिन्यांची, तर घंटागाडी कामगारांची 43 महिन्याची थकबाकी अद्याप मिळाली नाही याच्या निषेधार्थ सिवूड स्टेशन ते नवी मुंबई महानगरपालिका हा भव्य मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच असा मोराचा काढणार ससून त्याच्या सोबत अनेक मनसे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील.