Home महाराष्ट्र आता आम्ही मुंबई आणि पुण्याची लोकसंख्या कमी करणारचं : नितीन गडकरी

आता आम्ही मुंबई आणि पुण्याची लोकसंख्या कमी करणारचं : नितीन गडकरी

0

“भविष्यामध्ये मुंबई आणि पुणे शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न व्हायलाचं हवेत”, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मुंबई पुण्याबाहेर स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केले.मुंबई पुण्यासारख्या शहरातून गर्दी कमी करण्यावर भर देणं आवश्यक आहे. तसंच मुंबई बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी नमूद केलं.

झी 24 तास या वाहिनीने आयोजन केलेल्या डिजिटल कोनक्लेव या कार्यक्रमात गडकरी बोलत होते, ” मला कुठलाही प्रांतिक किंवा प्रादेशिक वाद करायचा नसून, मुंबई पुण्याची लोकसंख्या कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून करोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसंच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचं प्रमाणही कमी झालं पाहिजे, जेणेकरून पर्यटनासाठीही लोकं येतील, असे ते म्हणाले. भविष्यात पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहनं चालवण्यात यावी” असे ते म्हणाले.

“महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. भविष्यात राज्यातील वाहने ही LNG, CNG आणि इथेनॉलमिश्रीत पेट्रोलवर चालवण्यात यावीत. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्याबरोबरच वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर कमी होईल. याशिवाय, शेती आणि इतर क्षेत्रात महाराष्ट्राने अभिनव उपाययोजना राबवल्या पाहिजेत. सिंधुदुर्गातील विमानतळाचा नियोजनपूर्वक उपयोग केल्यास कोकणाचा चेहरामोहरा पालटू शकतो” असे नितीन गडकरी यांनी शेवटी सांगितले.