Home महाराष्ट्र नितेश राणेंच्या ट्विटमधील बेबी पेंग्विन नक्की कोण? राजकीय चर्चेला उधाण

नितेश राणेंच्या ट्विटमधील बेबी पेंग्विन नक्की कोण? राजकीय चर्चेला उधाण

0

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले सुशांत सिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा नवीन वळणावर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या निर्णयाचे स्वागत केले असून विरोधी पक्षांवर टीका करणे सुरू केले आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या निर्णयानंतर केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा रंगात आली आहे.

नितेश राणेंचे ट्विट पुढीलप्रमाणे:

या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, “अब बेबी पेंग्विन तो गयो”. या ट्विटचा अर्थ स्पष्ट झाला नसला तरी कुठल्यातरी राजकीय नेत्याला उद्देशून हे ट्विट करण्यात आले आहे असे स्पष्ट होते. तसेच #JusticeForSSR असे हॅशटॅग देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरले आहे.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले होते. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी राज्य सरकारकडून विरोध चालू होता. मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. तरीही बऱ्याच मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अखेर सीबीआयकडे सोपवले. त्यामुळे भाजपकडून राज्य सरकारवर अनेक टीका केल्या जात आहेत. त्यातच नितेश राणेंनी केलेले हे ट्विट चर्चेचा विषय झाले आहे. या ट्विटमध्ये त्यांचा नेमका रोख कोणावर आहे हे स्पष्ट होत नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.